शिक्षक दिन शुभेच्छा | शिक्षक दिन भाषण (5 सप्टेंबर 2023)

शिक्षक दिन शुभेच्छा: नमस्कार मित्रानो, या पोस्टमध्ये तुम्हाला 5 सप्टेंबर शिक्षक दिन माहिती,शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, शिक्षक दिन मराठी संदेश, शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये तसेच शिक्षक दिन निबंध, शिक्षक दिन कविता मराठी वाचायला मिळणार आहे.

शिक्षक दिन माहिती | 5 सप्टेंबर शिक्षक दिन माहिती मराठी | Teachers day information in marathi

शिक्षक दिवस काय असतो?
शिक्षक दिवस हा एक खास दिवस असतो ज्यादिवशी आपण आपल्या शिक्षकांचे आभार मानतो, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेले योगदान यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो. विद्यार्थ्याना शिकण्यास, चांगले बनण्यास त्यांनी घेतलेले परिश्रम यासाठी त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस असतो.

शिक्षक दिवस आपण का साजरा करतो?
फक्त आईवडीलच नाही तर शिक्षक हे आपले जीवन घडवण्यास मदत करतात. ते आपल्याला विषय समजून घेण्यास, आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास, आपण ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी आपली मदत करत असतात. शिक्षक दिवस हा त्यांचे मनापासून आभार मानण्याचा दिवस असतो.

आपण शिक्षक दिवस केव्हा साजरा करतो?
भारतात प्रत्येक वर्षी ०५ सप्टेंबर ला साजरा केला जातो. ०५ सप्टेंबर महान शिक्षक आणि भारताचे दुसरे रात्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो त्यानिमिताने हा दिवस शिक्षक दिवस साजरा केला जातो.

शिक्षक दिवस कसा साजरा केला जातो?
या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना कौतुक वाटेल अश्या गोष्टी करतात. बरेच विद्यार्थी शिक्षकांना फुले तसेच भेटवस्तू देखील देतात. शिक्षकांचा सन्मान वाढावा आणि त्यांच्याविषयी आपले प्रेम व्यक्त क्र्ण्यासाठी विद्यार्थी अनेक कार्यक्रम देखील घेतात.

शिक्षक आपले सुपरहीरो आहेत
आपल्याला शिकण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक कठोर परिश्रम घेत असतात. ते आपल्याला मोठे स्वप्न पाहण्यास, समस्या सोडविण्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतात.

शिक्षक दिन शुभेच्छा मराठी | शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | happy teachers day wishes in marathi

आम्हाला आमच्या आयुष्यातील ध्येय मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम घेणारया आमच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या शुभेछ्या.

आमचे सर्वात चांगले शिक्षक, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला आयुष्यात हवं ते मिळवता आले अश्या आमच्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या सर्व शुभेछ्या.

माझ्या सर्व चिरतरुण शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेछ्या.

आमच्यावर नेहमी विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या शुभेछ्या.

शाळेतील पुस्तकांसोबत आयुष्याचेही मौल्यवान धडे शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुमच्यासारखे शिक्षकच जग बदलवण्याची ताकद ठेवतात तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

शिक्षणाप्रती तुमचा त्याग आणि समर्पण खरच खूप कौतुकास्पद आहे तुम्हाला शिक्षक दिवसाच्या शुभेछ्या.

माझे मित्र, मार्गदर्शक होण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप शुभेछ्या.

तुम्ही फक्त शाळेतील विषयच शिकवले नाही तर आयुष्य कसे जगावे हे सुद्धा शिकवले आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या

आमच्यातील चांगल्या गोष्टीला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या.

तुमच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही मोठी स्वप्ने बघू शकलो आणि ते पूर्ण देखील करू शकलो. तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या.

तुमचे मार्गदर्शन म्हणजे आमच्या जीवनाची पुंजी आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

शाळेतील वर्गाला प्रेरणा आणि विकासाचे ठिकाण बनवण्यासाठी तुमचे मनापासून आभार. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्हाला प्रेम, आनंद आणि कौतुकांनी भरलेल्या दिवसाच्या खूप शुभेछ्या.

आमच्यावरील तुमचा प्रभाव हा आयुष्यभर असेल. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्ही फक्त एक शिक्षकच नाही तर एक चांगले गुरु आणि आमचे प्रेरणास्थान आहात. शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुमचे परिश्रम, त्याग आणि प्रेम यासाठी आम्ही जन्मभर आभारी असू. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्ही शिकवलेल्या गोष्टीमुळे आमच्यासाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत आणि आम्ही आयुष्यात यश सुद्धा मिळवले आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्ही आम्हाला दिलेले ज्ञान हे अमुल्य आहे आणि त्यावरच आम्ही आमचे आयुष्य आनंदाने जगत आहोत. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्ही दिलेल्या अतूट प्रेमासाठी आणि सहवासासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप शुभेछ्या.

तुम्ही आमच्यासाठी घेतलेले कठीण परिश्रम याचा आमच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. आमच्या यशस्वी आयुष्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप शुभेछ्या

तुमच्या मार्गदर्शन मिळाल्यामुळेच आम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकलो तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

आमच्या जीवनात तुम्ही जो आनंद भरला आहे त्यापेक्षा खूप जास्त पटीने तुमच्या आयुष्यात आनंद असावा. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्ही शाळेत शिकवलेल्या गोष्टी आमच्या जीवनात उपयोगी पडत आहेत. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

आमच्या विकासासाठी तुम्ही घेतलेले अनमोल आहेत. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

जेव्हा आमचा आमच्यावर विश्वास नव्हता तेव्हा तुमी आमच्यावर विश्वास ठेवला. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

तुम्ही आमच्यासाठी घेतलेले निस्वार्थ प्रयत्न आम्हाला जीवन कसे जगावे हे शिकवतात. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

शिक्षक दिन मराठी संदेश | happy teachers day quotes in marathi | heart touching teachers day quotes in marathi

एक शिक्षक ज्ञानाचे बीज लावतो त्याची काळजी घेतो आणि त्याला प्रेमाने वाढवतो.

शिक्षक हे नेहमी आपल्याला प्रेरित करत असतात आणि आपल्या भविष्याला आकार देत असतात.

जे सर्वात चांगले शिक्षक असतात ते पुस्ताकातून नाही तर मनातून शिकवतात म्हणून आपल्याला आवडतात.

एक चांगल शिक्षक आपल्यामध्ये ईछ्या निर्माण करू शकतो, तिला तेवत ठेऊ शकतो आणि आपल्याला ती प्राप्त करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत असतो.

शिक्षक हे फक्त एक विद्यार्थी घेऊन जग बदलू शकतात.

एका चांगल्या शिक्षकाला आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.

शिक्षक एक सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बनवण्याची ताकद ठेवतात.

प्रत्येक यशस्वी विध्यार्थ्याच्या मागे एक शिक्षक असतो जो त्याच्यावर विश्वास ठेवत असतो.

सर्वात चांगले शिक्षक ते असतात जे तुम्हाला कुठे पहायचे आहे ते सांगातात मात्र काय पहायचे आहे हे नाही सांगत.

शिक्षकाचा उदेश्य हा विध्यार्थाना त्याचे भविष्य घडवण्यासाठी मदत करणे हाच असतो.

शिक्षक हा तो प्रकाशा असतो जो आपल्या मनाला आंनी मेंदूला प्रकाशित करतो.

एका चांगल्या शिक्षकाचा प्रभाव हा फक्त वर्गापुरताच नसतो तर तो आयुष्यभरासाठी असतो.

शिक्षण हे कोणते काम नाही तर ते स्वतःला सशक्त बुद्धीने बनवायचे साधन आहे .

शिक्षक हे आपल्याला रस्ता दाखवू शकतात मात्र त्या रस्त्यावर विद्यार्थाला स्वताच चालावे लागते.

चांगले शिक्षक यांची मुलांसोबत सहानुभूती असते आणि ते विश्वास ठेवतात कि प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी विशेष असते आणि त्याला विकसित करण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात.

एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक जग बदलु शकतात.

शिक्षण फक्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी नाही तर समाजात बदल आणि विकास करण्यासाठी आहे.

सर्वात चांगले शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाही तर तुम्ही स्वतः उत्तर शोधाव यासाठी प्रेरित करतात.

शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये | शिक्षक दिनानिमित्त भाषण | teachers day speech in marathi

सर्वांना शुभ सकाळ,

आज, आपण एक विशेष दिवस म्हणजेच शिक्षक दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार्‍या, प्रेरणा देणार्‍या आणि चांगले व्यक्ती बनण्यास मदत करणार्‍या महान शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

आपले शिक्षक आपल्याला शिकण्यास आणि आयुष्यात यश मिळवण्यास खूप अथक परिश्रम घेत असतात. ते आपल्याला समजतील अश्या भाषेत कठीण संकल्पना सहज समजावून सांगतात, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ते देतात आणि कठीण काळात देखील आपल्याला साथ देतात. जेव्हा आपला स्वतावर विश्वास नसतो तेव्हा ते आपल्यावर विश्वास ठेवतात.

त्यांच्या समर्पणाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आपले शिक्षक मेणबत्त्यासारखे आहेत, ते जिथे जातील तिथे ज्ञान आणि प्रकाश पसरवतात. ते आपल्याला केवळ पुस्तकांतील ज्ञानच शिकवत नाहीत तर जगाचे ज्ञान देखील शिकवतात.

तर, या शिक्षक दिनी, जे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात, योग्य रस्ता दाखवतात अश्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.

धन्यवाद।

5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण | 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी | 5 september teachers day speech in marathi

सर्वांना सुभ सकाळ,

सर्वांना नमस्कार,

आमच्या सर्व प्रेमळ शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! आमच्या शिकण्याच्या विकासाच्या प्रवासात जे आपल्याला नेहमी योग्य मार्गदर्शन करतात त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस.

शिक्षकांशिवाय आपण जगाची कल्पनाच करू शकत नाही. ते शिक्षकच असतात जे आपल्याला वाचायला, लिहायला आणि आपल्या सभोवताली असणाऱ्या जगाला समजण्यास मदत करतात. शिक्षक आपल्याला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी मदत देखील करतात.

प्रत्येक दिवशी आपले शिक्षक हसरा चेहरा घेऊन वर्गात प्रवेश करतात. त्यांचे ज्ञान आणि अनुभव आपल्याला सांगण्यासाठी ते नेहमी तयार असतात. ते आपल्याला नव नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करतात आणि आपल्याला शिक्षणाचे महत्व देखील समजावून सांगतात.

तर मित्रानो, आपण आपल्या शिक्षकांचे कठीण परिश्रम, धैर्य, आपल्यावरील विश्वास यासाठी त्यांचे मनापासून आभार मानूया.

धन्यवाद।

शिक्षक दिन कविता मराठी | teachers day shayari in marathi

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी
लटकेली असतात
कित्येक भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची
निरागस अक्षरे
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा
त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ
नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून
सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच
कित्येक चेतनांना पाठबळ असते
त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे
शिक्षकाला जपावी लागतात
कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड
आणि आकार द्यावा लागतो
एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैत्यनाला…
कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं
जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत
निर्ममपणे…
कधी अंधाअ ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर
त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन
फळ्याची ढाल असते पाठीशी
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
-अज्ञात

निष्कर्ष:

तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वरील पोस्ट जी शिक्षक दिन शुभेछ्या, शिक्षक दिन भाषण मराठी कशी वाटली ते खाली comment करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या पोस्ट वाचायला आवडतात ते देखील सांगा.

Leave a Comment