{50+} मराठी कविता संग्रह |Heart Touching Marathi Kavita on Life |

या पोस्ट मध्ये तुम्हाला heart touching marathi kavita on life, marathi charoli, मराठी कविता संग्रह, मराठी चारोळी लिहिलेल्या आहेत ज्या तुम्हाला आयुष्य समजावण्यात मदत करतील. बऱ्याच अश्या गोष्टी आहेत जीवनाशी निगडित ज्याचा अजून उलगडाच झालेला नाही आहे. तरीही बऱ्याच कवी, लेखकांनी त्यांच्यापरीने त्यांचे जीवनाविषयीचे अनुभव लिहिले आहे. येथे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, दुःख, आनंद, प्रेम आहे. इथं कुणाजवळच सर्वकाही नाही. इथे प्रत्येकजण अपूर्ण आहे.  जीवनात आनंदी, समाधानी, यशस्वी होण्यासाठी लोकांना marathi kavita खूप मदत करतात.

कवितांमध्ये एक विशेष जादू असते जी हृदय आणि मनाला सर्वात मोहक मार्गांनी स्पर्श करू शकते. कल्पना करा की शब्द एका सुंदर रागाप्रमाणे एकत्र नाचतात, तुमच्या मनात चित्रे रंगवतात आणि तुमच्या आत्म्यात खोलवर भावना जागृत करतात. कवितांमध्ये क्षण, भावना आणि कल्पना कॅप्चर करण्याची अनोखी शक्ती असते, त्यांना एखाद्या मौल्यवान स्नॅपशॉटप्रमाणे वेळेत गोठवते. काही काळजीपूर्वक निवडलेल्या ओळींमध्ये ते आपल्याला हसवू शकतात, रडवू शकतात, प्रतिबिंबित करू शकतात आणि स्वप्न पाहू शकतात. कविता आपल्याला जगाला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास मदत करतात, आपल्या कल्पनाशक्तीला प्रज्वलित करतात आणि वरवर असंबंधित गोष्टींमधील संबंध निर्माण करतात. लहरी यमक असो किंवा हृदयस्पर्शी श्लोक असो, कविता ही सर्जनशीलतेचा खजिना आहे जी आपल्याला भाषेच्या सौंदर्याची आणि सामर्थ्याची आठवण करून देते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण कवितांच्या अद्भुत जगात डुबकी मारूया आणि आपल्या लक्षात येण्यापेक्षा त्या का महत्त्वाच्या का आहेत याची मंत्रमुग्ध करणारी कारणे शोधूया.

सुंदर मराठी कविता/चारोळ्या | Heart Touching Marathi Kavita on Life 

वाटेवरील प्रत्येक पाऊल
आता सावकाश पडत होते
लक्ष्य अवघड नव्हते
मात्र अनुभव कडवट होते

Heart Touching Marathi Kavita on Life

केव्हा संपेल जीवन
कुणालाच समजत नाही
मनासारखं जगून घ्यावं
कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही

जीवनाचा प्रवास
स्वतःच करायचा असतो
कुणीतरी सदैव सोबत असावं
असा हट्टसुद्धा धरायचा नसतो.

न कळणाऱ्या जीवनात
थोडं सांभाळून चालावं
सरळ रस्त्यावर वेगाने तर
वळणावर पाऊल जपून टाकावं.

जीवनात सदैव
आनंदी राहायचं असतं
कारण दुःखाचं गाठोडं इथं
प्रत्येकाच्या नशिबात असतं.

कुणी, आपल्यावर कोणाचा
भरवसा नाही म्हणून रडतो
तर कुणी, आपण इतरांवर
भरवसा ठेवला म्हणून रडतो

Heart Touching Marathi Kavita on Life

जीवनाच्या प्रवासात
अनेक लोकं भेटतात
साथ देणारे कमी अन
सोडून जाणारेच जास्त असतात.

दुसऱ्याविषयी बोलतांना
शब्द आठवावे लागत नाही
अन स्वतःविषयी बोलतांना
मग शब्द सुचत नाही.

प्रत्येकाने आयुष्यात
खूप व्यस्त असावं,
जे पैश्याने नाही मिळणार
ते कमवून बघावं.

आयुष्य फक्त
जिंकण्यासाठी नसतं
कधी हरण्यासाठी
तर कधी शिकण्यासाठी असतं.

Marathi Kavita on Life | Marathi Poem on Life

या अस्थिर आयुष्यात
काहीच स्थिर नसतं
कधी दुःखाचा सागर येतो
तर कधी सुखाचं तळं भेटतं

Marathi Kavita on Life | Marathi Poem on Life

हरण्या- जिंकण्यासाठी
कधीच खेळू नये
एकदा पुढे गेल्यावर
शिकल्याशिवाय मागे वळू नये.

लहान मुलाकडून
एवढंच शिकावं
सर्वांचं प्रेम मिळवण्यासाठी
हसावं आणि गप्प बसून राहावं.

भूतकाळाकडून नेहमी
शिकत राहावं
भविष्य घडवण्यासाठी
दररोज प्रयत्न करत राहावं.

दुःख सोसल्याशिवाय
सुखाच महत्व कळत नाही
हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय
दगडसुद्धा देव बनत नाही.

माझं आणि तुझं
यातच जीवन व्यस्त आहे
पण खरं तर ‘आपण’ म्हटलं
तरच जीवन मस्त आहे

Marathi Kavita on Life | Marathi Poem on Life

मोठ्या डोंगराच निर्माण जसं
छोट्याश्या दगडापासून होते
तसं मोठं स्वप्न साकारण्याची सुरुवात
पाहिलं पाऊल टाकल्यापासून होते.

लढाईत हरलात
तर पुन्हा जिंकता येईल
पण मनाने हरलात तर
जगणं कठीण होईल.

जे मिळालेल आहे
ते सांभाळून ठेवावं
अन जे मिळवायचं आहे
त्यासाठी प्रयत्न करत राहावं.

आल्या कितीही अडचणी
तरी आनंदाने लढत राहावं
जीवन आपलंच आहे
त्याच्यावर प्रेम करत राहावं.


वेळ जीवनात
सर्वकाही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरं कुणीच शिकवत नसते

मराठी कविता संग्रह


वेळ जीवनात
सर्वकाही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरं कुणीच शिकवत नसते

मराठी कविता संग्रह

दररोज आपल्याला पाहणारे
बरेच लोकं असतात
पण लक्षात जास्त तेच राहतात
जे पाहून न पाहिल्यासारखे करतात.

दररोजच्या आयुष्यात
फक्त पैसे कमावत न बसावं
आता किती श्वास शिल्लक आहेत
कधीतरी हे ही मोजून बघावं.

मानवतेच्या या दुनियेत
माहीत नाही किती दिवस राहू
पण इथून जातांना मात्र
लोकांच्या मनात घर करून जाऊ.

जंगली हिंस्र जनावर
फक्त शाररिक वेदना देतात
पण समाजातील वाईट लोकं
अवघी बुद्धीच पोखरून घेतात.

हातात टच फोन असणं
हे आजच्या वेळी गरजेचं आहे
पण सगळ्यांच्या टच मध्ये राहणं
हे चांगल्या जीवनासाठी गरजेचं आहे

मराठी कविता संग्रह

एकदा अहंकार चढला की मग
माणसाला माणूस दिसत नाही
दिव्याला जसा
त्याखालचा अंधार दिसत नाही.

कुणी आपल्याला दुखावल्यावर
चेहऱ्यावर आनंद ठेवता आला पाहिजे,
वादळे बरीच येतील जीवनात
त्यांच्याशी सामना करता आला पाहिजे.

कुणी सोबत असेल तर
खूप मस्त आहे जिंदगी
पण फक्त पैसाच असेल सोबती
तर मात्र त्रस्त आहे जिंदगी.

कशीही असली जिंदगी
तरी नेहमी आनंदी राहावं
एक संकट गेलं तर
नेहमी दुसऱ्यासाठी सज्ज असावं.

Marathi Charoli | मराठी चारोळी

नाही सहन झालं दुःख
तर थोडं रडून घ्यावं
दुःख सावरताना मग
सुखासाठी पण तयार असावं

Marathi Charoli | मराठी चारोळी

जे असतील नाराज
त्यांना एकवेळ समजावून बघावं
तरीही नाही समजतील
तर त्यांच्यापासून कायम दूर राहावं.

जीवनात जो नेहमी
संघार्षाच्या वाटेवर चालतो
जो काळ्यारात्रीला सुद्धा हरवू पाहतोतो
च उद्याचा सूर्य म्हणून उगवतो.

जीवनात सर्वांना नेहमी
आनंदच मिळत असतो
इतरांचं सुख पाहून
उगाच आपण दुःखी होतो.

इतरांच्या सुखावर जळणारे
इथं बरेच आहेत
दुःखाला सामोरे बघून
इथं पळणारे पण बरेच आहेत.

चेहऱ्यावरचा आनंद
कधी जायला नको
दुःखाला पाहून
डोळ्यात पाणी सुद्धा यायला नको

Marathi Charoli | मराठी चारोळी

विश्वास स्वतःवर ठेवला
तर कठीण काहीच नाही
आणि दुसऱ्यावर ठेवत राहिले
तर या जगी सोपं काहीच नाही.

डोळ्यात ज्यांच्या कधी
अश्रू दिसत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्यांना कधी दुःख होत नाही.

आहे जे मिळालेलं
ते मनापासून सांभाळावे
जे मिळवायचं असेल त्यासाठी
प्रामाणिक प्रयत्न करत रहावे.

ना कुणासोबत तुलना
ना कुणाचा द्वेष करावा
आपल्या ध्येयाचा पाठलाग
मनापासून करत राहावा

Famous Marathi Poem

सुखात सोबत असणारे
सर्वच खरे नसतात
जे दुःखात साथ देतात
तेच फक्त हिरे असतात

Famous Marathi Poem

दुःख काय असतं
हे कळतं सगळ्यांना
मात्र दुःखात सुख शोधण
नाही जमत सगळ्यांना

यश कुणासाठी, अपयश कुणासाठी
जीवनभर फक्त राग का इतरांसाठी
जो आला जन्माला, तो जाईल एकदिवस
मग एवढा मनात अहंकार कशासाठी

आपले डोळे बंद झाल्यावर
इतरांच्या डोळ्यात अश्रू यायला हवे
ज्यांनी जीवनभर त्रास दिलाय
त्यांनीही गुणगान गायला हवे

दुःखाने कितीही घेरलं तरीही
चेहऱ्यावर आनंद असावा
जे मिळणार नाही प्रयत्नानंतरही
त्याचाही मनापासून स्वीकार करावा

गरिबाला जेव्हा
हसताना पाहिलं,
पैशाचं महत्व माझ्यासाठी
तेव्हा कमी झालं

Famous Marathi Poem

पाहिजे असलेलं मिळवण्यासाठी
कुणाला काबाडकष्ट करावे लागते,
तर कुणाला ते जन्मजातच मिळते
मित्रहो जिंदगी ही अशीच असते

कुणाला पैशाची कमतरता,
कुणाला आरोग्याची, अन नात्यांची चिंता
सर्वगुणसंपन्न इथं कुणीच नसते,
मित्रहो जिंदगी ही अशीच असते.

कुणी सत्तर वर्ष जगते
तर कुणी तिशीतच जाते
जो दुसऱ्यासाठी जगते
शेवटी तोच लक्षात राहते

इतरांशी तुलना करून
इथं बरेच होतात दुःखी
जे स्वतःशी तुलना करतात
तेच असतात सुखी

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्हाला heart touching marathi kavita on life, marathi charoli, मराठी कविता संग्रह, मराठी चारोळी कश्या वाटल्या ते comment मध्ये नक्की लिहा.

1 thought on “{50+} मराठी कविता संग्रह |Heart Touching Marathi Kavita on Life |”

Leave a Comment