प्रेम कविता चारोळ्या | बायको साठी चारोळी | Marathi Charoli

या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी marathi charoli, मराठी चारोळ्या, प्रेम कविता चारोळ्या,  बायको साठी चारोळी, मराठी प्रेम कविता चारोळ्या, romantic marathi charolya, मराठी चारोळी प्रेम, prem marathi charoli वाचायला मिळतील.
जीवन ज्याच्याविना जगणे शक्यच नाही अशी गोष्ट म्हणजे प्रेम. एक प्रेमच असते जे मनाने खचलेल्या माणसाला प्रेरणा, दुःखी माणसाला आनंद देते. प्रेम मग ते कुठलही असो आईचे प्रेम, वडिलांचे प्रेम, भावा-बहिणीचे प्रेम, पती-पत्नीचे प्रेम जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची गरज असतेच. प्रेमामुळेच माणूस आनंदी, उत्साही, समाधानी राहतो.
जर तुम्हांला सुद्धा प्रेम या विषयावरील कविता, चारोळ्या वाचायाच्या असतील तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. चला तर मग वाचायला सुरुवात करा.

Marathi Charoli | मराठी चारोळ्या

गुलाबाला माहीत झालं, चंद्राला पण कळालं, माझं हे मन फक्त, तुझ्यासाठी धडकतं.

marathi charoli

आसमंतात दिसती हजारो तारे, पण चंद्रासारखा कुणी नाही, लाखो चेहरे दिसती धर्तीवर, पण तुझ्यासारखा कुणी नाही.

धरून तुझा हाथ, तुला दूर घेऊन जाईल, जिथं तूझ्या-माझ्याशिवाय, फक्त प्रेम दिसून येईल.

तुला सोडून मनात, दुसरं कुणीच नाही, ओठावरही नाव आता, तुझ्याशिवाय कुठलंच नाही.

मनात धडकणारा, तू एक हिस्सा आहे, तुझ्यासाठीच जगण्याचा, हा सर्व किस्सा आहे.

marathi charoli

पहिल्या नजरेत तिने, केला मनावर वार, मग तीच झाली माझ्या, जीवनाचा संपूर्ण सार.

बोलतांना तिच्याशी, शब्दच सुचत नाही, पण तिला पाहिल्याशिवाय, मन माझंपण लागत नाही.

प्रेम कविता चारोळ्या | बायको साठी चारोळी

झोपही आता, दिवसरात्र येत नाही, तुझा विचार मनातून, एक क्षणही जात नाही.

marathi charoli

आयुष्यातील प्रत्येक क्षणी, सोबत तुझी असावी, तुला विसरून आता, मला जिंदगीही नसावी.

एकवेळ झालेलं प्रेम, विसरल्या जात नाही, तुझ्याशिवाय मन आता, कुठेही रमत नाही.

माझी तुझ्याशी आता, नाही कुठलीच तक्रार, तू सोबत असो वा नसो, प्रेम तुझ्यावरच करणार.

माझं मन आणि जीवन, तुझ्यावर ओवाळतो, मला हवा असलेला जीवनसाथी, फक्त तुझ्यातच दिसतो.

तू कविता असशील तर, मला शब्द बनायच आहे, तुला मिळवायचं नाही, तर मला तुझंच व्ह्यायच आहे.

marathi charoli

तुला सोडून आता, काहीच आठवत नाही, तुला आठवल्याशिवाय, आता एकही क्षण जात नाही.

मराठी प्रेम कविता चारोळ्या

नाही आणू शकत तुझ्यासाठी, मी चंद्र आणि तारे, पण कधीच नाही येऊ देणार, तुझ्या आयुष्यात दुःखाचे वारे.

marathi charoli

मनाच्या प्रत्येक कप्प्यात, आता तूच भरली आहे, माझ्या प्रत्येक श्वासात, तुझीच प्रतिमा कोरली आहे.

तू रुसली तर, काळजी वाटते, तू हसली की, काळजी मिटते.

नजरानजर झाल्यावर, तुझं लाजणं मनाला भावतं, मग तुला फक्त नजरच नाही, तर मनसुद्धा बघायला लागतं.

सोडून जाताना मला म्हणाली, परत प्रेम करशील का माझ्यावर, मी म्हणालो ‘सोडून तू गेली’ मला, मी तर अजूनही प्रेम करतोय तुझ्यावर.

समुद्रात भटकलेल्या नावे, लाकिनाऱ्याची ओढ असते, माझ्या अंधारलेल्या आयुष्यातही, सदैव तुझ्या प्रेमाची ओढ असते.

तू असली सोबत, तर दुःख पण सुख असते, तुझ्याविना मला तर, सुख पण दुःख वाटते.

Romantic Marathi Charolya | Marathi Charoli on Love

तुला विसरायचं म्हंटल, की सर्वच आठवते, तुझ्याबद्दलच प्रेम, मग आणखी घट्ट होते.

marathi charoli

तू सोबत असली की, रडण्यालाही अर्थ आहे, तू सोबत नसली की, मग हसणं सुद्धा व्यर्थ आहे.

मी सागर तर तू, किनारा आहेस, माझ्या अंधारलेल्या आयुष्यात, तूच प्रकाशाचा निखारा आहेस.

दिवसभरात मी, कितीशे चेहरे पाहतो, मात्र स्वप्नात फक्त, तुझाच चेहरा दिसतो.

तुझ्या चुकीसाठी, तुला शिक्षा कुठलीच नाही, कारण तुला त्रास व्ह्यावा, हे माझ्या मनाला पटतच नाही.

marathi charoli

माझ्या आनंदामागील कारण, तू अशीच बनून रहा, जीवनात नाही आली तरी चालेल, फक्त माझं जीवन होऊन रहा.

तुझ्यासाठी नसेल मी, तुला हवा तसा, पण माझ्यासाठी तू, जगण्यासाठी श्वास जसा.

Marathi Charolya Premachya

कदाचित माझ्यापेक्षा चांगला, तुला कुणी भेटू शकेल, पण माझ्यासारखं, तुलाच जीवन मानणारा, कदाचित तो नसेल.

marathi charoli

जीवनात अडचणी, तेव्हाच त्रास देतात मला, जेव्हा तुझा हात माझ्या हातात, नाही दिसत मला.

एक काळ निघून गेला, तुझ्यावर प्रेम करून, पण तुला आजही माहीत नाही, माझ्या मनात तू आहेस घर करून.

नसेल होणार तू माझी, तरी मला दुःख नाही, हे प्रेम आहे माझं, कोणती जिद्द नाही.

कारणे तर त्रास देणाऱ्याला, मागितले जातात, जे खरं प्रेम करतात, ते विश्वास जपत असतात.

बोलणं सुरूच राहावं, गप्पा संपूच नये, डोळ्यात तुझ्या बघत रहावं, अन पापणी झुकूच नये.

प्रेमात ज्यांनी अख्ख, आयुष्य बरबाद केलं, तेच म्हणतात, प्रेमात काहीच नाही पडलेलं.

Marathi Charoli Prem | Prem Charoli Marathi

जर मन एकच असेल, तर प्रेमही एकदाच करावं, जसं असेल तसं, आयुष्यभर जपावं.

marathi charoli

एकट्यात हसू येणं, हे प्रेम असतं, एखादी गोष्ट सर्वांपासून लपवणं ,हे प्रेम असतं.

हृदय जीने जिंकलं, ती तोडू सुद्धा शकते, प्रेमाने भरलेल्या डोळ्यात ती, अश्रू सुद्धा आणू शकते.

माझ्या मनाला, हे कळलच नाही, प्रेम तोपर्यंत चांगल असते, जोपर्यंत ते होत नाही.

माझ्या प्रत्येक श्वासात, तू बसलेली आहेस, माझ्या प्रत्येक क्षणात, तू भरलेली आहेस.

जोपर्यंत हृदयाला, श्वासाचा पुरवठा असणार आहे, तोपर्यंत मी फक्त, तुझ्याशीच प्रेम करणार आहे.

marathi charoli

कळत नाही मला, तुला नाही कसं म्हणावं?, श्वासाला नाही म्हणून, जीवन कसं जगावं?

मराठी चारोळी प्रेम

जर माझं आयुष्य फुल असेल, तर तू त्याचा सुगंध आहेस, मी खळवळणारा सागर असेल, तर तू त्याला शांत किनारा आहेस.

सोडून तू जाशील, तर तुला अडवणार नाही, मात्र माझ्या आयुष्यात, पुढचा दिवस उगवणार नाही.

प्रेमाची खात्री पाहिजे, तर सोडून बघ मला, पुढच्या क्षणी माझ्या गेल्याची, खबर मिळेल तुला.

तुला सोडून कधीच, जाणार नाही मी, तूझ्याविना आता एक क्षणही, जगणार नाही मी.

तुझ्या माझ्यातलं अंतर, जेवढं वाढत आहे, आपल्या प्रेमाची पातळी, तेवढी रुजत जात आहे.

तिच्या प्रेमाच्या नशेत, मी सावरलो नाही, तिने मला स्वकारलं नाही, मी सुद्धा कुणाचा झालो नाही.

फुल मी असेल तर, त्याचा सुगंध तू आहेस, रात्र मी असेल तर, त्यामधील चांदण तू आहेस.

प्रेम माझं तुझ्यावरचं, कधीच कमी होणार नाही, जेव्हा असं काही घडेल, तेव्हा मी असणार नाही.

marathi charoli

तुझ्यासाठी चंद्र तारे, नाही आणू शकणार, मात्र तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, कधी कमी नाही होऊ देणार.

निष्कर्ष :

तुम्हाला वर लिहिलेल्या marathi charoli, मराठी चारोळ्या, प्रेम कविता चारोळ्या, बायको साठी चारोळीकश्या वाटल्या ते खाली comment मध्ये लिहून नक्की सांगा.

Leave a Comment